मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागातील महत्त्वाच्या पदावर प्रणित शेळके सध्या कार्यरत असून त्याला गिर्यारोहणाची प्रचंड आवड आहे. शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने प्रणित शेळके या गिर्यारोहकाने वीर सावरकरांना अनोखे अभिवादन केले.
आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर केले सर
वीर सावरकर आय् ए एस् स्टडी सर्कलचा विद्यार्थी प्रणित शेळके याने बुधवारी, १६ फेब्रुवारी रोजी मुंबईहून आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचे ठरवले आणि स्वा. सावरकर आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने २६ फेब्रुवारी रोजी किलिमंजारो हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर त्याने सर केले आणि स्वा. सावरकर निर्मित ध्वज फडकविला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद शिंदे यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली प्रणितने किलिमंजारो या अत्त्युच्च हिमशिखरावरील चढाई केली. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले एव्हरेस्टवीर शेख रफिक यांनाही प्रणितने या कामगिरीचे श्रेय दिले आहे. प्रणित हा वीर सावरकरांचा कट्टर अनुयायी असून त्याला गड-किल्ले, ऐतिहासिक वैभवावर भ्रमंती करण्यास आवडते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रणितने हिमालयातील ३ मोठाले शिखर सर केले आहेत.
(हेही वाचा – ‘मनसे विद्यार्थी सेने’ला मिळाले नवे ‘गुरुजी’! मराठी भाषा गौरव दिनी पक्षाचा मोठा निर्णय)
जाणून घ्या प्रणित शेळकेबद्दल…
मुंबई अग्निशमन दलाचा प्रणित शेळके पहिला प्रशिक्षित असून जो गिर्यारोहक आहे. बालमोहन’चा माजी विद्यार्थी आणि उच्चशिक्षित असलेल्या प्रणितला त्याच्या या दलाचा खुप अभिमान असून अत्यंत तुटपुंज्या कालावधीत गिर्यारोहणाद्वारे मिळवलेल्या यशाचे संपूर्ण श्रेय तो मुंबई अग्निशमन दलास देतो. #ड्रिम_ॲडव्हेंचर… या संस्थेने प्रणितला किलिमंजारो मोहिमेकरीता मोलाचे साह्य केले. यासह प्रत्येक गिर्यारोहण साहसाकरीता कायमच पाठिशी असल्याचे सांगितले जात आहे. किलिमंजारो हे फार मोठे आव्हान आहे किंवा चढाईच्या दृष्टीने अतिकठीण श्रेणीचे शिखर आहे असे नाही. पण कालपरवापर्यत निव्वळ गड-कोटांच्या भटकंतीला येणारा प्रणित आज अचानक परिश्रमपूर्वक तयारी करुन आफ्रकेतील अर्थात् विदेशातील मोहिमेवर निघाल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.