डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपेक्षा निम्मे नवे कोरोना रुग्ण, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती बाधित

94

बुधवारी राज्यभरात १८ हजार ६७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र दुप्पटीने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या होती. एका दिवसांत राज्यातील विविध भागांतून ३६ हजार २८१ रुग्ण कोरोना उपचारातून बरे होऊन घरी गेले. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली नोंदवली जात असल्याची खुशखबर आहे. पुण्यातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्येत घट नोंदवला जात आहे. पुण्यात सात हजारांनी सक्रीय रुग्णसंख्येत घट होत बुधवारी ५२ हजार २६५ रुग्णसंख्या नोंदवली गेली. येत्या आठवड्यात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात येईल, असा आरोग्य विभागातील अधिका-यांचा अंदाज आता तंतोतंत खरा ठरत असल्याचे बुधवारच्या आकडेवारीनंतर स्पष्ट झाले. आता नाशिक आणि अहमदनगरमध्येही रुग्णसंख्येत घट नोंदवली जात आहे.

गेल्या तीन दिवसांतील कोरोनाची रुग्णसंख्या वाढलेल्या जिल्ह्यांची आकडेवारी

जिल्हा  ३१ जानेवारी    १ फेब्रुवारी     २ फेब्रुवारी

मुंबई   ८ हजार  ९००               ८ हजार ८८८                 ८ हजार १५८
ठाणे     १५ हजार  २५४           १३ हजार २९६               ११ हजार ६७६
रायगड  ५ हजार १६४               ४ हजार २६६                 ३ हजार ८१२
पुणे      ६२ हजार ३६५            ५९ हजार २०४               ५२ हजार २६५
नाशिक   १५ हजार ५४९             १४ हजार ८४८              १३ हजार ४५६
अहमदनगर  ९ हजार ५८८            ९ हजार १२७               ८ हजार ६८७
नागपूर      २४ हजार ६००           २२ हजार ८३१              २० हजार ४५२

तिस-या लाटेत मुंबई, ठाण्यातच सुरुवातीला तिस-या लाटेचा कहर दिसून आला. परंतु तीन आठवडयांतच मुंबई, ठाण्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली. त्यादरम्यान रायगड आणि अहमदनगरमध्येही रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली होती. दोन आठवड्यांपू्र्वी पुणे, नाशिक आणि नागपूरात रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली होती. परंतु जानेवारी महिन्याच्या अखेरीनंतर रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली.

० बुधवारी राज्यात ७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
० राज्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
० राज्यात आता १ लाख ७३ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
० राज्यात आतापर्यंत ७७ लाख ५३ हजार ५४८ कोरोना रुग्ण आढळले
० राज्यात आतापर्यंत ७४ लाख ३३ हजार ६३३ रुग्ण कोरोनातून बरी होऊन घरी गेले

आज राज्यात ११३ ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांची नोंद झाली. नागपूरात ४२, मुंबई व ठाण्यात १८, नवी मुंबईत १३, पुण्यात ६, अमरावतीत ४, साता-यात ३, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी २, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी-चिंचवडमध्ये आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी १ नवा रुग्ण आढळला. राज्यात आता ३ हजार ३३४ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आतापर्यंत दिसून आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.