ओमायक्रॉनचा कहर सुरूच! राज्यात बुधवारी किती रूग्णांची झाली नोंद; वाचा…

बुधवारी राज्यात १ हजार ९६६ नवीन रुग्णांची नोंद

118

बुधवारी राज्यात २ हजार ७४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. बुधवारी ५ हजार ८०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आता राज्यात केवळ २७ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु होते. राज्यात ४१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात १११ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांचा चाचणी अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला.

बुधवारी जिल्हानिहाय आढळलेले ओमायक्रॉनचे रुग्ण 

  • अहमदनगर-२१,
  • नवी मुंबई-१९,
  • जालना व यवतमाळ- प्रत्येकी १५,
  • औरंगाबाद -१०,
  • नागपूर व मुंबई प्रत्येकी ९,
  • ठाणे मनपा-६,
  • मीरा भाईंदर मनपा व सातारा प्रत्येकी-३,
  • लातूर-१

    (हेही वाचा – …तर तीव्र आंदोलन करणार, एसटी कर्मचा-यांचा इशारा)

  • महत्वाचे… 

    👉 राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ % एवढे झाले आहे
    👉आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६७,५७,२३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५०,४९४ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
    👉सध्या राज्यात २,७९,७४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,१६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.