११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक

खरेदीची बनावट बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या एकाला महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने बुधवारी अटक केली. सय्यद तैकीर हसन रिजवी असे या व्यक्तीचे नाव असून, १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळवत करचुकवेगिरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

( हेही वाचा : राज्यात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू)

३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी मे. पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ९९.२७ कोटी रुपयांची खोटी खरेदीची बिजके प्राप्त केली. त्यातून त्यांनी शासनाची सुमारे १७.८७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले.

आरोपीला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अन्वेषण अधिकारी डॉ. विद्याधर जगताप, सहाय्यक राज्यकर आयुक्त हे मोहन चिखले, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. चालू आर्थिक वर्षात करचुकवेगिरी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने २८ अटक कारवाया केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here