दारू तस्करांचा भन्नाट जुगाड! LPG सिलेंडरमधून केली दारूची तस्करी

139

तळीराम दारू पिण्यासाठी काय करतीय याचा काही नेम नाही… नुकताच एक प्रकार बिहारमधून समोर आला आहे. बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली असली तरी देखील तेथे बेकायदेशीर मद्यविक्री सर्रास होताना दिसतंय. बिहारमध्ये दारू तस्कर दारूसाठी एकाहून एक भन्नाट पर्याय शोधत असल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहे. दारूसाठी पठ्यानं थेट एलपीजी सिलेंडरमध्ये दारूच्या बाटल्या लपवून दारूची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. सध्या दारू तस्करांचा हा भन्नाट जुगाड पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. दारू तस्करांनी केलेला हा जुगाड पाहून पोलीसही थक्क झाले आहेत. या प्रकरणी मंगळवारी पाटणामध्ये पीरबहोर पोलीस ठाण्यात पोलिसांनी एका दारू तस्काराला अटक केली.

पाटणामध्ये पीरबहोर पोलीस ठाण्यात पोलिसांनी एका दारू तस्काराला अटक केली असून त्याच्याकडून साधारण ५० लीटर दारू जप्त केली आहे. कोणालाही समजणार देखील नाही, असा जुगाड या दारू तस्कराने केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारू तस्करी करणारा व्यक्ती एलपीजी सिलेंडरमध्ये देशी दारू घेऊन पाटणा येथे जात होता. एलपीजी सिलेंडर उलटा केल्यानंतर त्यात दारूच्या बाटल्या ठेवता येतील अशी त्याची रचना केल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे.

बघा व्हिडिओ

पोलिसांकडून अटक करण्यात आलेला दारू तस्कर सोनपूर येथे राहणारा असल्याचा सांगितले जात आहे. पोलिसांकडून आरोपी भूषणची चौकशी सुरू असून मागील किती दिवसांपासून हे काम करत आहे, आणखी किती जणांचा सहभाग आहे, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या व्यक्तीने गोणीमध्ये गॅस सिलेंडर ठेवला होता. पोलिसांनी या घरगुती गॅस सिलेंडरची तपासणी केली. सिलेंडरच्या खालील बाजूस झाकण लावण्यात आले होते. हे झाकण उघडल्यानंतर पोलिसांना शीतपेयांच्या प्लास्टीकच्या बाटलीत देशी दारू असल्याचे आढळून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.