रत्नागिरीत साखरेचा ट्रक उलटून अपघात; चालक जागीच ठार

Motor-school bus accident in ratnagiri ,14 students survived
रत्नागिरीत मोटार आणि १४ विद्यार्थ्यांच्या स्कूल बसचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक उलटून चालक जागीच ठार झाला. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

कर्नाटकातून जयगड बंदराकडे साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक (क्र. केए २३ ए ६६९४) हातखंबा येथील दर्ग्याजवळ उलटला. त्यामध्ये चालक फारूख इसाक जमादार (वय ३८, रा. बागलकोट, कर्नाटक) याचा मृत्यू झाला असून क्लीनर कामरान कलादगी (वय २४, रा. बागलकोट, कर्नाटक) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा ट्रक सोमवारी सकाळी हातखंबा येथील उतारावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूच्या मोकळ्या जागेत उलटला. ट्रक उलटला तेथे दोन बैल चरत होते. ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैल जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

(हेही वाचा – पुणे- बंगळूर महामार्गावर इनोव्हाचा भीषण अपघात; दोन महिला जागीच ठार)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here