ताडोबाच्या जंगलाजवळ वाघाने घेतला माणसाचा बळी!

152

चंद्रपूरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मूल तालुक्यात वाघाने एका इसमाचा बळी घेतला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र असलेल्या मूल तालुक्यात महिन्याभरात दुस-यांदा वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाला आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतात मजुरीचे काम करणा-या रामभाऊ मरापे या ४३ वर्षीय इसमावर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास वाघाचा हल्ला झाला. मरापे यांचा मृतदेह शेताजवळील नाल्यात वनाधिका-यांना सापडला. मरापे शेतातून परत न आल्याने त्यांचा शोध सुरु झाला. त्यावेळी नाल्याजवळ मरापे यांचा मृतदेह आढळून आला.

( हेही वाचा : Monkey Pox आजाराची धास्ती! केंद्र सरकारने जारी केल्या गाईडलाईन्स)

गावकऱ्यांची मागणी

जंगलाला लागून असलेल्या शेतात सातत्याने प्राण्यांची ये-जा सुरु असते. त्यामुळे सकाळच्या वेळेत जंगल क्षेत्रातील शेतात जाणे टाळा, अशी विनंती वनविभागाने गावक-यांना केली आहे. वनविभागाने तातडीने मृताच्या कुटुंबीयांना २५ हजारांची रक्कम दिली. या सर्व प्रक्रिया आटोपेपर्यंत सायंकाळ झाली. मात्र वनविभाग मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईसाठी घरी गेले असता वाढत्या वाघांच्या हल्ल्याविरोधात कारवाई करा, वाघांना जेरबंद करा, अशी मागणी गावक-यांनी केली.

कोणत्याही माणसांनी आखलेल्या सीमारेषा समजत नाही. जंगल असो वा जंगला नजीकचा बफर झोन, वाघांचा वावर असल्यास रात्री किंवा भल्या पहाटे जंगलात किंवा जंगला नजीकच्या भागांत जाणे टाळा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.