लेडीज टेलर ते संशयित दहशतवादी… महाराष्ट्र एटीएसकडून आणखी एकाला अटक

गेल्या महिन्याभरात दहशतवादी कारवायांशी संबंधित ही मुंबईतील तिसरी कारवाई आहे.

123

गेल्या महिन्याभरात दहशतवादी कारवायांचा कट रचणा-या दोन दहशतवाद्यांना मुंबईतून अटक करण्यात आल्यानंतर, आता महाराष्ट्र एटीएसने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. वांद्र्याच्या खेतवाडी परिसरातून एका लेडीज टेलरला एटीएसच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. गेल्या महिन्याभरात दहशतवादी कारवायांशी संबंधित ही मुंबईतील तिसरी कारवाई आहे.

(हेही वाचाः जान मोहम्मदवर २० वर्षांपूर्वी दाखल झाला होता गुन्हा… काय म्हणाले एटीएस प्रमुख?)

कोण आहे आरोपी?

जोगेशरी आणि मुंब्रा परिसरातून झाकीर आणि रिझवान यांच्या अटकेनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तिसऱ्या आरोपीला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख असल्याची माहिती मिळत आहे. मोहम्मद इरफान शेख हा परिसरात टेलरिंगचे काम करत होता व लेडीज टेलर म्हणून परिसरात त्याची ओळख होती, अशी माहिती समोर आली आहे. गेले काही दिवस एटीएसकडून मोहम्मदच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने महाराष्ट्र एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याला गुरुवारी दुपारी ४ वाजता मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः जान मोहम्मदच्या वरच्या खोलीचे काय आहे रहस्य?)

(हेही वाचाः ‘या’ कामासाठी गेला होता जान मोहम्मद दुबईला!)

महाराष्ट्र एटीएसकडून तिसरी कारवाई

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 6 दहशतवाद्यांना अटक केली. त्यामधील एक आरोपी जान मोहम्मद हा सायन परिसरात राहत होता. जान मोहम्मदच्या अटकेनंतर एटीएसनेसुद्धा तपासाला सुरुवात केली असून, झाकीर, रिझवान आणि आता मोहम्मद इरफान शेख याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे कनेक्शन?

झाकीर व रिझवान या दोघांना एटीएसने चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीतून एटीएसच्या कोठडीत घेतले असून, ४ ऑक्टोबर पर्यंत हे दोघे एटीएसच्या ताब्यात असणार आहेत. झाकीरच्या चौकशीत वांद्रे पूर्व खेतवाडी येथे राहणारा मोहम्मद इरफान शेख याचे नाव पुढे आल्यानंतर बुधवारी एटीएसने इरफान शेख याला खेतवाडीतून अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या या सर्व दहशतवाद्यांचा दिल्लीतून अटक केलेल्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः सातव्या दहशतवाद्याला मुंबईतून अटक! आता महाराष्ट्र एटीएस झाली ऍक्टिव्ह!)

(हेही वाचाः मुंब्र्यातील रिझवानचे काय होते दहशतवादी कनेक्शन?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.