जगातील श्रीमंत लोकांपैकी एक दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वृत्तपत्रांचे मालक Keith Rupert Murdoch

220
कीथ रुपर्ट मरडॉक (Keith Rupert Murdoch) हे ऑस्ट्रेलियन वंशाचे अमेरिकन व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि मीडियाचे मालक आहेत. त्यांच्या न्यूज कॉर्प कंपनीद्वारे, ते जगभरातील शेकडो स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांचे आणि वाहिन्यांचे मालक आहेत.
यूके मध्ये (द सन आणि द टाइम्स), ऑस्ट्रेलियामध्ये (द डेली टेलिग्राफ, हेराल्ड सन आणि द ऑस्ट्रेलियन), यूएस मध्ये (द वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क पोस्ट), तसेच २०१८ पर्यंत ते स्कायचे, २०१९ पर्यंत २१st सेंच्युरी फॉक्स ची मालकी देखील त्यांच्याकडे होती.
रुपर्ट मरडॉक (Keith Rupert Murdoch) यांचा जन्म मेलबर्न येथे ११ मार्च १९३१ रोजी झाला. त्यांचे वडील युद्ध-वार्ताहर होते आणि नंतर प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये काम करु लागले. तसेच त्यांच्या मालकीचे दोन वृत्तपत्र देखील होते. हेराल्ड आणि वीकली टाईम्स प्रकाशन कंपनीचे अध्यक्षही होते.
मरडॉक हे जगातील श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. मार्च २०२२ पर्यंत त्यांच्याकडे यूएस$२१.७ बिलियन संपत्ती होती. ते युनायटेड स्टेट्समधील ३१ वे आणि फोर्ब्स मासिकानुसार जगातील श्रीमंतांच्या यादीत ७१ व्या स्थानावर आहेत.
मरडॉक यांना संचार माध्यमांचे सम्राट म्हटले जाते. वाहिन्यांचे मालक असल्यामुळे ते राजकारणातही सक्रिय आहेत. २००० पर्यंत, मरडॉक यांच्या न्यूज कॉर्पोरेशनकडे ५० पेक्षा जास्त देशांमध्ये ८०० पेक्षा जास्त कंपन्यांची मालकी होती. त्यांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आज ११ मार्च म्हणजे त्यांचा ९४ वा वाढदिवस. मरडॉक (Keith Rupert Murdoch) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.