श्रीनगरमधील सौरा येथील अंचर भागात मंगळवारी, २४ मे २०२२ रोजी दहशतवाद्यांनी एका पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्याची मुलगीही जखमी झाली आहे. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा वाटेतच मृत्यू झाला.
दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील सौरा येथील अंचर भागात दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचारी सैफुल्लाह कादरी यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला केला. या गोळीबारात कादरी आणि त्यांची मुलगी जखमी झाली. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलीवर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. सर्व नाक्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही स्कॅन केले जात आहेत. स्थानिक नागरिकांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
(हेही वाचा केरळमधील पीएफआयच्या मोर्च्यात हिंदुविरोधी प्रक्षोभक घोषणा)
Join Our WhatsApp Community