ईडीने डॉन डी कंपनीच्या विरोधात फास अधिकच घट्ट आवळण्यास सुरुवात केली आहे. इकबाल कासकरला अटक करून त्याच्या चौकशी दरम्यान ईडीच्या हाती काही महत्वाची माहिती लागलेली आहे. या अनुषंगाने ईडीने पुन्हा मुंबईतील ७ ठिकाणी सोमवारी सकाळपासून धाडसत्र सुरू केले आहे. हे धाडसत्र डी कंपनीला आर्थिक रसद पुरवणाऱ्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील पेडररोडसह इतर ७ ठिकाणी धाड
ईडीच्या १३ जणांच्या पथकाने मुंबईतील पेडररोड तसेच इतर ७ ठिकाणी धाडी टाकून काही महत्वाचे दस्तवेज ताब्यात घेतले आहे. दाऊदशी संबंधित असणाऱ्या राज्यातील काही राजकीय नेत्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम ईडीकडून सुरू आहे. भारतात दहशत पसरविण्यासाठी दाऊदने एक विशेष टोळी तयार केली असून या टोळी मार्फत देशातील महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करून देशासह मुंबईवर एकदा पुन्हा आपली दहशत निर्माण करण्याची दाऊद प्रयत्न असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आलेले आहे.
डी कंपनीचा कट उधळून लावण्यासाठी केला तपास सुरू
एनआयएने दाखल केलेल्या एफआयआयमध्ये दाऊदसहित बड्या गँगस्टरची नावे असून अनिस शेख, जावेद चिकना, छोटा शकील आणि टायगर मेमन यांचा देखील त्यात आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. एनआयए आणि ईडी या तपास यंत्रणेने डी कंपनीचा हा कट उधळून लावण्यासाठी तपास सुरू केला असून डी कंपनीला आर्थिक फंडिग करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी ईडीने मनीलोंदरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा – बापरे! कोरोनाच्या ५० हजार लसी जाणार वाया…पण का?)
दरम्यान ईडीने मागील आठवड्यात डी कंपनीवर गुन्हा दाखल केल्यानंतर दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्या बंद असलेल्या नागपाड्यातील घरासह डी-कंपनीसह संबधी दहा ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने खंडणीच्या गुन्ह्यात तळोजा कारागृहात असलेल्या दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ताबा घेऊन त्याला शुक्रवारी अटक केली आहे. तसेच छोटा शकील याचा मेहुणा सलीम फ्रुट याच्याकडे दोन ते तीन वेळा ईडी च्या कार्यालयात बोलावून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community