Online Admission : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे महत्वाचे आहे.

168
Online Admission : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून भरता येणार अर्ज

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (Online Admission ) गुरुवार २५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही (Online Admission) मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

(हेही वाचा – HSC Result : नैराश्यात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून समुपदेशकांची नियुक्ती)

अशातच आता निकाल (Online Admission) जाहीर होताच मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवार 27 मे पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे महत्वाचे आहे.

हेही पहा – 

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी (https://mumoa.digitaluniversity.ac/) या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्यांना ही नोंदणी प्रक्रिया 27 मे ते 12 जून 2023 या कालावधीत दुपारी 1 वाजेपर्यंत करता येणार आहे.

त्यांनतर (Online Admission) पहिली गुणवत्ता यादी 19 जून रोजी सकाळी 11 वाजता, दुसरी गुणवत्ता यादी 28 जून संध्याकाळी 7 वाजता, तर तिसरी गुणवत्ता यादी 6 जुलै सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

विद्यार्थ्यांने स्वतःबद्दलची माहिती भरुन नोंदणी करावी.

त्यांनतर एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.

युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वतःबदलची माहितीची खातरजमा करुन घ्यावी. (विद्यर्थ्यांना पासवर्ड बदलण्याची मूभा देण्यात आली आहे.)

विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजरआयडी आणि पासवर्ड किंवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वतःबद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, इ. माहिती भरावी लागेल.

त्यानंतर स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.

ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमुद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.