मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 ची उभारणी करण्यात आली असून या दोन्ही मेट्रो मार्गावरील निम्म्या भागात मेट्रो सुरू आहे. यासह उर्वरित मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असून येथील मार्गावर मेट्रोची चाचणी देखील घेण्यात आली आहे. मात्र या मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी फक्त एका सर्टिफिकेटची प्रतिक्षा आहे आणि ते सर्टिफिकेट म्हणजे कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी.
(हेही वाचा – 7th Pay Commission: वेतन सुधारणा समिती २०२२ समोर बाजू मांडण्याचा महापालिका कामगार आणि संघटनांसाठी शेवटचा दिवस)
मेट्रो सुरू करण्यासाठी कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी प्रमाणपत्र मिळाले की मेट्रो रेल सेफ्टी प्रमाणपत्र मिळाले की मेट्रो रेल्वे डिसेंबर महिन्याच्या मध्यात उर्वरित मार्गावर देखील वेगाने धावू लागेल, अशी आशा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.
पुन्हा एकदा मेट्रो नव्या मार्गावर धावणार
पहिल्यांदा वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी या दोन्ही मार्गाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मेट्रो नव्या मार्गावर धावत आहे. मेट्रो ७ ही दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशी असून मेट्रो ६ स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या पद्धतीने सर्व मेट्रो लाईन जुळणार आहेत. मेट्रो ७ ही १६.५ किमी लांब आहे, या मार्गावर १३ स्थानके आहे. मेट्रो २ अ हा मार्ग १६.८ किमीचा आहे. या मार्गावर १७ स्थानके आहेत. हा मार्ग घाटकोपर अंधेरी- वर्सोवा या मार्गाला जोडणार आहे. मेट्रो २ ब डी.न. नगर मंडाळे असा वाढविला जाणार आहे.