Chandrayan 3 : चंद्रयान-३ च्या ‘मोहिमेचे उरले फक्त सात दिवस

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सुस्थितीत

184
Chandrayan 3 : चंद्रयान-३ च्या 'मोहिमेचे उरले फक्त सात दिवस
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सुChandrayan 3 : चंद्रयान-३ च्या 'मोहिमेचे उरले फक्त सात दिवस स्थितीत

भारताची महत्वपूर्ण अशी कामगिरी म्हणजेच ‘चंद्रयान -3′ (Chandrayan 3) मोहीम संपूर्ण जगासाठी फायद्याची आणि प्रेरणादायी ठरत आहे.ही मोहीम पुढील सात दिवसांमध्ये संपणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सुस्थितीत असूनही, इस्रोने हा निर्णय घेतला आहे.
चंद्रयान-३ चांद्रयान-3’ मोहिमेची काही महत्वाचे टप्पे होते त्यातील पहिला टप्पा म्हणजे – चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणं. इस्रोने हे उद्दिष्ट यशस्वीपणे पार पाडलं. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर, अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पोहोचणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.या मोहिमेचं दुसरं उद्दिष्ट म्हणजे, प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीपणे डिप्लॉय करणे. हेदेखील इस्रोने यशस्वीपणे पार पाडलं. प्रज्ञान रोव्हर हे सध्या चंद्रावर फिरत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या खड्ड्यामधून ते यशस्वीपणे वाट काढत आहे.या मोहिमेचं दुसरं उद्दिष्ट म्हणजे, प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीपणे डिप्लॉय करणे. हेदेखील इस्रोने यशस्वीपणे पार पाडलं. प्रज्ञान रोव्हर हे सध्या चंद्रावर फिरत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या खड्ड्यामधून ते यशस्वीपणे वाट काढत आहे.
१४ दिवसांची मोहीम
ही मोहीम अवघ्या १४ दिवसांची असण्याला चंद्रावरील सूर्यप्रकाश कारणीभूत आहे. चंद्रावरील एक पूर्ण दिवस हा पृथ्वीवरील२८ दिवसांएवढा असतो. म्हणजेच, चंद्रावर १४ दिवस सातत्याने सूर्यप्रकाश असतो, आणि १४दिवस अंधार. विक्रम लँडर ज्या दिवशी चंद्रावर उतरले, त्या दिवशी चंद्रावर सूर्योदय झाला होता. म्हणजेच, तिथून पुढे १४ दिवस चंद्रावर सूर्यप्रकाश असणार आहे.प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरमध्ये असलेली उपकरणे ही पूर्णपणे सोलार-पॉवर्ड आहेत. म्हणजेच, सूर्यप्रकाश नसेल तर ही उपकरणे चालू शकणार नाहीत. यामुळेच या मोहिमेची मुदत ही पृथ्वीवरील१४ दिवस एवढी ठेवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर बच्चू कडू यांचे आंदोलन)

याचा शोध लावला
चांद्रयान-3 ने आतापर्यंत चंद्रावर महत्त्वाचे शोध लावले आहेत. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आणि इतर मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मँगनीज आणि सिलिकॉन अशा घटकांचा समावेश आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर हायड्रोजनचा शोध घेत आहे. चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.