Operation Ajay : एकूण २१२ जणांची पहिली तुकडी भारतात दाखल

120
Operation Ajay : एकूण २१२ जणांची पहिली तुकडी भारतात दाखल

भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २१२ प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले होते. हे विमान आज सकाळी ६ वाजता भारतात पोहोचले. मायभूमीत उतरताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं विमानतळावर पाहायला मिळालं.

घमासान युद्ध सुरू असलेल्या इस्रायलमधून अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान भारतात उतरले. ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) अंतर्गत भारत सरकार ही मोहीम राबवत आहे. इस्रायलमधील तेल अवीव येथे भारतीय नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मायभूमीत परतण्यासाठी हजारो भारतीयांची धावाधाव सुरू आहे. त्यातच, २१२ प्रवाशांसह पहिलं विमान दिल्लीत पोहोचलं आहे. यावेळी, प्रवाशांनी विमानतळावर उतरताच इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी सांगितल्या. तसेच मायभूमीत उतरल्याचा आनंदही व्यक्त केला. आपल्या लहान मुलांसोबत अनेकजण भारतात परतले. त्यावेळी, भारत सरकारचे सर्वांनी आभारही मानले.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इराणचे परराष्ट्रमंत्री सीरियात येणार होते; इस्रायलने विमानतळांवरच फेकले बॉम्ब )

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही विमानातून (Operation Ajay) उतरलेल्या भारतीयांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रवाशांसोब संवाद साधला. मायभूमीत उतरताच अनेकांचे डोळे पाणावले होते. मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलो, आपल्या लोकांमध्ये आलो, आपल्या जमिनीवर उतरलो, अशी भावना भारतीयांमध्ये दिसून आली.

भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते भारतीय कंपन्यांसोबत ऑनलाइन बैठका (Operation Ajay) घेत आहेत, ई-मेलद्वारे भारतातील विमानांची माहिती पाठवत आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.

शनिवार ७ ऑक्टोबरपासून (Israel Palestine Conflict) इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. अशातच इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांनी इस्रायलमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी सुखरूप परत आणण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. (Operation Ajay)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.