जम्मू आणि काश्मिरच्या (Jammu Kashmir) पुलवामामध्ये (Pulwama) सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआउट (Operation All out) अंतर्गत रविवारी रात्री उशिरापर्यंत इन्काउंटरमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. रविवारी कुपवाडामध्ये जवानांनी दोन आणि कुलगामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव शौकत आहे.
काश्मीर खो-यात टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांकडून ऑपरेशन ऑलआउट राबवण्यात आले होते. रविवारी सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये सोमवारी पुलवामा येथे एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर, रविवारी कुपवाडा येथे दोन दहशतवादी आणि कुलगाम चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नाना घालण्यात आले.
( हेही वाचा: मोठी बातमी! मलिक आणि देशमुख यांना विधान परिषदेच्या मतदानासाठी परवानगी मिळणार? )
जैश-ए- मोहम्मदचे दहशतवादी
लोलाबच्या जंगलातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी शौकात अहमदच्या जागी पोलिसांनी रविवारी कुपवाडामध्ये शोध मोहिम राबवली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले चारही दहशतवादी जैश-ए- मोहम्मदचे होते.
Join Our WhatsApp Community