ड्रग्स विरोधात सीबीआयचे ‘ऑपरेशन गरुडा’

इंटरपोल आणि एनसीबी यांच्या समन्वयाने जागतिक ऑपरेशन सुरू

153

देशभरात पसरलेले अमली पदार्थाचे जाळे उदध्वस्त करून देशात होणारी अमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करीचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने देशभरात ‘ऑपरेशन गरुडा’ राबवून १२७ गुन्हे दाखल करून १७५ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर देशभरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या कारवाईसाठी सीबीआयने इंटरपोल, एनसीबी तसेच प्रत्येक राज्यातील पोलीस यंत्रणेची मदत घेतली आहे.

हिंद महासागर क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत

सीबीआयने आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘ऑपरेशन गरुडा’ सुरू केले आहे. ऑपरेशन गरुडा ही मोहीम आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाच्या माध्यमातून देशभरात अमली पदार्थाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात आहे, या तस्करांचे नेटवर्क नष्ट करून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता राबविण्यात येत आहे. हिंद महासागर क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करून बेकायदेशीर ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या तस्करीचा सामना करण्यासाठी इंटरपोल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्या समन्वयाने हे जागतिक ऑपरेशन सुरू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कला आंतरराष्ट्रीय अधिकार क्षेत्रामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

(हेही वाचा महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून देणाऱ्या नेत्याच्या विधानांना महत्त्व देत नाही; शिंदे गटाचे प्रत्युत्तर)

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कला लक्ष्य

ऑपरेशन गरुडा, सीबीआयच्या नेतृत्वाखालील जागतिक ऑपरेशनमध्ये हँडलर, ऑपरेटिव्ह, उत्पादन क्षेत्र आणि त्यांना समर्थन करणाऱ्या घटकांविरुद्ध कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कला लक्ष्य करण्यात येत आहे. सीबीआय आणि एनसीबी या दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणेकडून माहितीची देवाणघेवाण, विश्लेषण आणि विकासासाठी देशातील राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस यंत्रणेशी जवळून समन्वय साधत आहेत. या ऑपरेशनमध्ये सीबीआय आणि एनसीबी व्यतिरिक्त पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि मणिपूरसह ८ राज्ये केंद्रशासित प्रदेश पोलिसांनी भाग घेतला आहे.

किती अमली पदार्थांचा साठा जप्त केला?

ऑपरेशन गरुडा या मोहिमेत पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र आणि एनसीबीसह अनेक राज्य पोलिस दलांकडून या विशेष ऑपरेशन दरम्यान सुमारे ६,६०० संशयित व्यक्ती तपासल्या गेल्या आहेत. तसेच देशभरात १२७ नवीन गुन्हे दाखल झाले असून या गुन्ह्यात फरार घोषित करण्यात आलेल्या ६ गुन्हेगारांसह सुमारे १७५ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ५.१२५ किलो हेरॉइनसह बेकायदेशीर औषधे आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त करण्यात आले आहे. ३३.९३६ किलो गांजा, ३.२९ किलो चरस, १३६५ ग्रॅम मेफेड्रोन; ३३.८० स्मॅक, सुमारे ८७ गोळ्या, १२२ इंजेक्शन्स आणि बुप्रेनॉर्फिनच्या ८७ सिरिंज, अल्पाझोलम च्या ९४६ गोळ्या, १०५.९९७ किलो ट्रामाडोल, १० ग्रॅम हॅश ऑइल, ०.९ ग्रॅम एक्स्टेसी गोळ्या, १.१५० किलो अफू, ३० किलो विषारी पावडर आणि ११,३०९ नशेच्या गोळ्या आणि कॅप्सूल जप्त करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.