देशातील तरुण-तरुणींना लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरवणा-या संस्थेची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने एनडीए प्रवेश प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणा-या लेखी परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 7 जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
या पदांसाठी भरती
ही प्रवेश प्रक्रिया एनडीएच्या 150वी आणि नेव्हल अॅकॅडमीच्या 112 व्या तुकडीसाठी असून यामध्ये एकूण 400 जागा राखीव आहेत. या 400 पैकी 370 जागा एनडीएसाठी असून, 19 जागा मुलींसाठी राखीव ठेवल्या आहेत, तर नेव्हल अॅकॅडमीसाठी 30जागा असून, ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी आहे.
( हेही वाचा: 195 कोटी रुपयांची जगातील सर्वात महागडी कार पाहिली का ? पाहा फोटो )
एनडीएमध्ये तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाणार
बारावी उत्तीर्ण झालेल्या व बारावीत असलेल्या मुला-मुलींना या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. यासाठी वयोमर्यादा देखील ठेवली आहे. एनडीएची परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असून, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती द्याव्या लागणार. त्यानंतर वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पार पडेल. या प्रक्रियेपासून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना एनडीएमध्ये तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण जुलै 2023 पासून सुरु होईल.
एनडीए प्रवेश प्रक्रियेशी निगडित माहिती व अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
Join Our WhatsApp Community