स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शिवमोग्गा येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंसोबत वीर सावरकर यांचा फोटो लावण्याला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या प्रकरणी तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले, त्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
प्रदर्शनातून वीर सावरकरांचा फोटो काढण्याची मागणी
शिवमोग्गा येथील बीएच रोडवरील सिटी सेंटर मॉलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंचे प्रदर्शन महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केले होते. मात्र त्यावेळी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या सोबत वीर सावरकर यांचा फोटो लावण्यास विरोध केला. वीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक नव्हते, असे सांगत या प्रदर्शनातून वीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्यात यावा, अशी मागणी करत धरणे आंदोलन सुरु केले. तसेच स्वातंत्र्य चळवळीत अनेक मुस्लिमांनी बलिदान दिले होते परंतु अधिकाऱ्यांनी एकाही मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकाचा फोटो या प्रदर्शनात लावला नाही, असेही कार्यकर्त्यांनी म्हटले.
(हेही वाचा धर्मांतर केल्यास १० वर्षांची शिक्षा, हिमाचलमध्ये कायदा मंजूर)
वातावरणात तणाव
त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिन समारंभात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप शहर विंगचे अध्यक्ष जगदीश यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
Join Our WhatsApp Community