भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मृती स्थळ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) मध्येच बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीवरून राजकीय पक्षांमध्ये वादा-वादीही सुरू झाली आहे. परंतु प्रत्यक्षात गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृती स्थळाला विरोध करण्याची ताकद कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये नाही. त्यामुळे ही मागणी मान्य होईल असे वाटत असून तसे झाल्यास या स्मृती स्थळाच्या उभारणीसाठी मैदानातील पाच जागांचे पर्याय असू शकतील.
गान कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्कमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि त्यानंतर आता भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कमध्येच बनवले जावे, अशा प्रकारची घोषणा केली होती आणि त्यानंतर स्मारकाची एकच चर्चा सुरू झाली. तिथूनच स्मारकाच्या दृष्टीकोनातून हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच्याशेजारी म्हणजे जिथे स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी बकुळीचे झाड लावले होते आणि जिथे बाळासाहेबांच्याहस्ते कडू निंबाचे झाड लावले होते तिथे स्मृती स्थळ उभारण्याचा प्रस्ताव महापालिका गटनेत्यांच्या सभेत मंजूर करत बांधण्यात आले.
दिदींच्या निधनानंतर पुन्हा स्मृती स्थळाची चर्चा
मात्र, लता दिदींच्या निधनानंतर पुन्हा एकदा स्मृती स्थळाची चर्चा आणि मागणी होऊ लागली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी लता दिदींचं शिवाजी पार्कवरच स्मृती स्थळ उभारण्यात यावे, अशा प्रकारची मागणी केली. मात्र कदम यांची स्मृती स्थळाची मागणी असताना माध्यमे आणि विविध राजकीय पक्ष याचा स्मारकाशी संदर्भ जोडत आहे. परंतु आता कॉंग्रेसनेही पाठिंबा दिला असून शिवसेनेने यावर विचार करता येईल, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राजकारणासाठी पार्कचा बळी देऊ नका, दादरकरांना खेळण्यासाठी संघर्ष करून अतिक्रमण पासून हे मैदान वाचवले, अशाप्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे एक प्रकारे स्मृती स्थळाच्या या मागणीला वादाची फोडणी पडली आहे. मात्र, लता दिदींसाठी मनसेचा हा विरोध मावळल्यास दिदींचे स्मृती उभारले जाऊ शकते आणि तसे झाल्यास मैदानातील सहा जागांच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.
(हेही वाचा – २०२४साठी मोदी सरकारचा काय असणार मास्टर स्ट्रोक? जाणून घ्या…)
स्मृती स्थळाच्या उभारणीसाठी हे असतील जागांचे सात पर्याय
१) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि समर्थ व्यायाम शाळा यांच्यामधील मोकळी जागा
२) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि नागरी संघ यांच्या मधील मोकळी जागा
३) महाकाली मातेच्या मंदिराच्या मागील बाजूस बंगाल क्लब शेजारी
४) बंगाल क्लब आणि स्काऊट अँड गाईड मधील मोकळी जागा
५) मैदानाच्या उत्तर दिशेला, तिथे दिलीप गुप्ते मार्गाचा शेवट होतो तेथील मैदानाच्या जागी
६) आजी-आजोबा पार्क शेजारी उत्तरेकडील मोकळी झाले
७) विद्यमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाच्या जागेला जोडून…
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या शेजारील जागा आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ यांच्या मधील जागा वाढवून विद्यमान बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला जोडून लता दिदींचे स्मृती स्थळ बनवता येऊ शकते.
Join Our WhatsApp Community