-
ऋजुता लुकतुके
फिनटेक कंपन्या सध्याच्या बँकिंग व्यवस्थेचा कणा आहेत. पण, अगदी सुरुवातीला १९९० मध्ये माहिती तंत्रज्जान आणि बँकिंग सेवा यांचा खरा मिलाफ आयफ्लेक्स सोल्युशन्स या कंपनीने जुळवून आणला होता. सिटी कॉर्प या बँकिंग सेवा देणाऱ्या कंपनीनेच सिटी माहिती तंत्रज्जान इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने आपली एक उपकंपनी सुरू केली होती. राजेश हुक्कू यांना त्यासाठी सिटी कॉर्पकडून ४ लाख अमेरिकन डॉलर इतकं बीज भांडवल मिळालं होतं. आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीसाठी या कंपनीने बनवलेलं फ्लेक्सक्युब हे सॉफ्टवेअर तेव्हा आफ्रिकन आणि अमेरिकन खंडांमध्ये गाजलं होतं. (Oracle Financial Services)
(हेही वाचा- Thane – Borivali Subway मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य)
अशी ही आयफ्लेक्स कंपनी चांगली वाटचाल सुरू असतानाही भारतात सगळ्यांना फारशी ठाऊक नव्हती. कंपनीचे ग्राहक बाहेरचे होते. पण, ओरॅकलचे मालक आणि माहिती तंत्रज्जान क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक दीपक घैसास यांनी २००५ मध्ये आयफ्लेक्स कंपनीतील सिटी कॉर्पचे ४१ टक्के शेअर विकत घेतले. आणखी काही दिवसांनी आणखी काही शेअर विकत घेतले.. आणि तिथून पुढे ही कंपनी बनली देशातील कथितरित्या पहिली फिनटेक कंपनी. ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने प्रसिद्ध झालेली ही कंपनी दीपक घैसास यांच्या संकल्पनेतून विस्तारली. आणि भारतात आणि देशाबाहेर बँकिंग क्षेत्रासाठी आवश्यक सेवा कंपनीने देऊ केल्या. (Oracle Financial Services)
२००८ मध्ये ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस नावाने कंपनीची नोंदणी झाली. आणि कंपनीचे संस्थापक सदस्य होते राजेश हुक्का, दीपक धैसास आणि आर रवीशंकर. रिटेल, कॉर्पोरेट आणि गुंतवणूक बँकांची अथपासून इतिपर्यंत सगळी कामं ही या कंपनीच्या सॉफ्टवेअरवर चालतात. इक्विनॉक्स या उपकंपनी मार्फत ओरॅकल कंपनी आपली बीपीओ सेवाही चालवते. (Oracle Financial Services)
(हेही वाचा- Ganeshotsav Best Buses : गणेशोत्सवात रात्री बेस्टची सेवा मिळणार का ?; प्रशासनाचा मुंबईकरांना दिलासा)
या कंपनीत सध्याच्या घडीला जगभरात ८,७५४ कर्मचारी काम करतात. आणि कंपनीचा महसूल आहे ६,३७३ कोटी रुपयांचा. (Oracle Financial Services)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community