अनंतचतुर्दशीला पावसाचा हाहाकार माजणार, राज्यात मुसळधार पावसाचे अंदाज

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता पावसाच्या पूर्वानुमानात बदल केले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत गुरुवारपासून अतिवृष्टीला सुरुवात होत आहे. शुक्रवारपासून पावसाचे धुमशान सुरु राहणार आहे. तिन्ही जिल्ह्यांत अनंतचतुर्दशीच्या आदल्यादिवसापासून रविवारपर्यंत ऑरेंज अलर्ट राहणार आहे. सोमवारीही रायगड आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे, तर उत्तर कोकणात शनिवारपासून सोमवारपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात शनिवार-रविवारी, साता-यात शनिवारपासून सलग तीन दिवस अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांना पावसाच्या मा-याचा सामना करावा लागणार आहे.

शुक्रवारी रायगड, रत्नागिरीत मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात पावसाचा जोर वाढणार आहे. संपूर्ण किनारपट्टीवर
वा-यांचा जोर आता कमी होत चालला आहे. पालघर, मुंबई, ठाण्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर अंतराने वारे वाहतील. शुक्रवारी रायगड, रत्नागिरीत पाऊस रौद्ररुप धारण करेल.

उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट

उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी वा-याचा जोर असणार आहे. नाशिक जिल्ह्यात रविवार वगळता सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस होईल. अहमदनगर, कोल्हापुरात वीकेण्डला मुसळधार पाऊस होईल. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीकेण्डनंतर पुण्यात पावसाचा मारा कमी होत मुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचा केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात! )

पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

शनिवारी सांगली आणि सोलापुरात मात्र पाऊस फारसा सक्रीय नसेल. या भागांत हलका पाऊस होईल.

मराठवाड्यातही मुसळधार पावसाच्या सरी

परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये वीकेण्डपर्यंत वा-याचा वेग कायम असणार आहे. तिन्ही जिल्ह्यांत मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट राहील. काही भागांत शनिवारी, तर काही भागांत रविवारनंतर वा-यांचा प्रभाव संपेल. लातूर, उस्मानाबादला
वा-यांच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत यलो अलर्ट राहील.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीचा ऑरेंज अलर्ट 

वीकेण्डला चंद्रपूर आणि गडचिरोलीत अतिवृष्टीचा पूर्वानुमान हवामान खात्याने मागे घेतला आहे. शनिवारी मुसळधार सरीनंतर सलग दोन दिवस गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होईल. सोमवारपर्यंत संपूर्ण विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासाठी यलो अलर्ट कायम राहील.

(हेही वाचा दहशतवादी याकूबची कबर कोणी सजवली? महापालिका आयुक्त म्हणतात…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here