कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय

82

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने राज्यातील लसीकरण मोहीम पुन्हा वेग देण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले असताना मुंबई व पुणे या शहरांत वाढती कोरोनाची रुग्णसंख्या आता आव्हानात्मक ठरु लागली आहे. मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या ८९६ झाली आहे.

( हेही वाचा : ताडोबात तीन दिवसांत वाघाचा दुसरा हल्ला    )

आरोग्य विभागाने दिली माहिती 

सोमवारी राज्यात १२९ नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीत आता राज्यात १ हजार ५२६ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मुंबई खालोखाल पुण्यातही रुग्णसंख्या ३०७ पर्यंत नोंदवली गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. रविवारी पुण्यात ३१० कोरोना रुग्णांची संख्या होती. या संख्येत सोमवारी अल्प प्रमाणात घट नोंदवली गेली. सोमवारी मुंबईत ११ नवे रुग्ण आढळून आले. या नोंदीमुळे मुंबईत आता रुग्णसंख्या ८९६ पर्यंत पोहोचली आहे. याव्यतिरिक्त ठाण्यात सध्या १६६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्क्यांवर नोंदवले गेले.

  • १६ मे रोजी राज्यात १२९ नव्या रुग्णांचे निदान झाले.
  • १६ मे रोजी राज्यात १२१ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले.
  • राज्यातील मृत्यूदर – १.८७ टक्के.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.