विवाहस्थळी रुखवताऐवजी अवयवदान प्रचार प्रसाराचा स्टॉल; नवदांपत्याचे सामाजिक भान

नुकताच जुहू येथे अश्विनी वराडकर आणि कौशिक रॉय यांचा एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. मराठी आणि बंगाली मिश्र विवाह सोहळा होताच परंतु आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे रुखवताचे टेबल न ठेवता या दोघांच्या आग्रहाने गेली ४२ वर्षे नेत्रदानविषयक कार्य करणारे ठाण्यातील श्रीपाद आगाशे यांनी एका बाजूला नेत्रदान, त्वचा दान, अवयवदान आणि देहदान या दानांच्या प्रचार प्रसारार्थ एक स्टॉल लावलेला होता.

या स्टॉलला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला. बऱ्याच जणांनी मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषांतील माहितीपत्रके घेतली, काही जणांनी संकल्पपत्रेही घेतली तसेच देहदान आणि अवयव दान यातला फरक बऱ्याच जणांनी आवर्जून माहिती करून घेतला. या स्टॉलवरच विविध सामाजिक विषयांवरील पुस्तके सवलतीच्या दरात आगाशे यांनी उपलब्ध करून दिलेली होती त्याचाही बराच लाभ उपस्थितांनी घेतला. आगाशे यांची एक आगळीवेगळी कला म्हणजे नखचित्रे काढणे! ती सुद्धा येथे लोकांना पाहता आली, त्याचे प्रात्यक्षिकही बऱ्याच जणांनी आवर्जून पाहिले. एकूण वधूवरांना आशीर्वाद देतानाच या सामाजिक भानही जपणाऱ्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचेही उपस्थितांनी बरेच कौतुक केले.

(हेही वाचा लालपरी नव्या रुपात; एसटीच्या ताफ्यात येणार स्लीपर बस)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here