संवाद पुणे व बढेकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंती निमित्त महानायक सावरकर क्रांती सूर्याची तेजस्वी गाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम व सावरकर विचारधारा युवा पुरस्कार शनिवार दिनांक २८ मे रोजी ५:३० वाजत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
अभिनेत्री व लेखिका अपर्णा चोथे हिला सावरकर विचारधारा युवा पुरस्कार माननीय नीलम ताई गोऱ्हे – उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बडेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा – महाकवी वीर सावरकर गीत गायन स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ)
पुरस्कार वितरणानंतर महानायक सावरकर हा गीत संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे . कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची असून निर्मिती निकिता मोघे यांनी केली आहे . कार्यक्रमाची संहितां आणि निवेदन ऋचा थत्ते यांची असून श्रुती देवस्थळी , सुजित सोमण , हेमंत वाळूजकर हे पार्श्वगायक सहभागी होतील, वाद्यवृंद दर्शना जोग, अमृता ठाकूर देसाई, ऋतुराज कोरे, केदार मोरे राजेंद्र सबनीस हे सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशे आव्हान संवाद पुण्याचे सुनील महाजन यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community