Oscar Awards 2023: भारताने रचला इतिहास; नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवाॅर्ड

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने बेस्ट ओरिजनल साॅंग कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला. नाटू नाटू गाण्याने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारदेखील पटकावला होता. आता या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

( हेही वाचा: अभिमानास्पद! भारताच्या The Elephant Whisperers ने पटकावला ऑस्कर )

आरआरआरच्या टीमची ऑस्करला हजेरी

अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर तसेच आरआरआर चित्रपटाने दिग्दर्शक एस.एस राजमौली, संगीतकार एम.एम. कीरवानी यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी ऑल ब्लॅक लूक केला .

आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला . या चित्रपटात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनीदेखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

भारताच्या The Elephant Whisperers ने पटकावला ऑस्कर

ऑस्कर 2023 मध्ये भारताच्या ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटाने बाजी मारली आहे. या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डाॅक्युमेंट्री शाॅर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here