मुंबईत १ हजार १४४ अधिकृत मशिदी; ८०३ मशिदींना भोंग्याची परवानगी

मुंबईत १ हजार १४४ अधिकृत मशिदी असून ८०३ मशिदीच्या विश्वस्तांनी भोंग्याना परवानगी मिळावी म्हणून मुंबई पोलिसांकडे अर्ज दाखल केले होते त्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस विभागाच्या एका जेष्ठ अधिकारी यांनी दिली आहे .

( हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘हा’ रेल्वेमार्ग करताना 24 हजार कामगारांनी गमावला हाेता जीव )

८०३ मशिदींना भोंग्याची परवानगी

राज्यात मागील काही आठवड्यांपासून धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंग्याचा वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचललेल्या भोंग्याचा मुद्दा हा राज्यभर गाजत आहे, राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत सरकारला अल्टिमेन्टम दिल्यानंतर राज्यातील बेकायदेशीर भोंग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान राज्यभरातील धार्मिक स्थळावरील भोंग्याबाबत कायदेशीर परवानगी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईत अधिकृत धार्मिक स्थळाची माहिती मागवली असता मुंबईत या ११४४ अधिकृत मशिदी आहेत, त्यापैकी ८०३ मशिदीच्या विश्वस्तानी भोंगे लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज मुंबई पोलीसाकडे पाठवले होते.

मुंबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ८०३ मशिदींना भोंगे लावण्यासाठी रीतसर परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस दलाच्या एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारांना माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here