मुंबईत सलग काही दिवसांपासून ओमायक्रॉनच्या विषाणूचे रुग्ण आढळत असताना पालिकेच्या जनुकीय चाचणीच्या सहाव्या फेरीतील निष्कर्षाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधोरेखित केले आहे. पालिकेने घेतलेल्या २९८ नमुन्यांपैकी केवळ २ टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
२९७ नमुन्यांपैकी १८३ नमुने हे डेल्टा विषाणूच्या डेल्टा डेरिव्हेक्टिव्ह या उपप्रकारातील दिसून आले, तर १०५ नमुने डेल्टा व्हेरिएंट या उपप्रकाराचे होते. केवळ सात नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचा विषाणू आढळल्याचे पालिकेच्या आरोग्यविभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – बैलगाडा शर्यत होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं…)
वैद्यकीय तपासणीतील ठळक घटक
- २९७ रुग्णांपैकी १०३ रुग्णांचा वयोगट २१ ते ४० मधील दिसून आला. ८० रुग्ण ४१ ते ६० वर्षांमधील होते तर उर्वरित ६८ रुग्ण ६१ ते ८० वयोगटातील होते
- २९७ रुग्णांपैकी १९ रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतली होती. त्यापैकी तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र कोणालाही ऑक्सिजन किंवा अतिदक्षता विभागाची गरज भासली नाही
- १९४ रुग्णांपैकी ३३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील केवळ एका रुग्णालाच ऑक्सिजनची गरज भासली, एकाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. या सर्व १९४ रुग्णांनी कोविडच्या दोन्ही लसी घेतल्या होत्या.
- २९७ रुग्णांपैकी ८४ रुग्णांनी कोविडपासून बचाव करण्यासाठी दोन्ही लशींच्या मात्रा घेतल्या नव्हत्या. ८४ रुग्णांपैकी २२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २ रुग्णांना ऑक्सिजन तर २ रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार दिले गेले.
Join Our WhatsApp Community