मुंबईत धो-धो बरसणाऱ्या पावासाने गुरुवारी दिवसभरात थोडा ब्रेक घेत संध्याकाळी पुन्हा बरसायला सुरुवात केली. पावसासाठी मुंबईत गुरुवारी अतिवृष्टीसह ऑरेंज अलर्ट असला तरीही प्रत्यक्षात पावसाची संततधार कुठेही दिसून आली नाही. मुंबईतील हवामानासाठी कार्यान्वित असलेल्या दोन रडारपैकी कुलाब्याचे एस बेन्डचे रडार दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – पुरामुळे मेळघाटच्या अनेक गावांचा संपर्क तुटला)
मुंबईतील पावसाळा, हवामानाची स्थिती यासाठी कुलाबा येथील एस बेंडचे रडार महत्वाची भूमिका बजावते. सायंकाळी साडेपाचपर्यंत कुलाब्यात फक्त 8.4 मिमी पाऊस झाला होता तर सांताक्रूझला 18.8 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या तीन तासांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येणाऱ्या भागात पावसाचा मारा सुरु आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, तसेच मुलुंड भांडुप या भागात पावसाची संततधार सुरु आहे.
Join Our WhatsApp Community