देशासह राज्यात कोरोना कहर सुरू असून गेल्या काही दिवसात कोरोनाचा संसर्ग हा राजकीय नेते आणि बड्या मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर मंत्रालयातील कित्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आता मात्र जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलातील एकूण 18 बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तांसोबत चार अप्पर पोलीस आयुक्त आणि तेरा पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. सोबतच मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 48 तासात मुंबई पोलीस दलातील 114 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली तर तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 125 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा –उद्यानांच्या देखभालीसाठी आधी निविदा रद्द, पुन्हा त्याच दरात नेमले कंत्राटदार)
या 18 बड्या अधिकाऱ्यांमध्ये 1 सह पोलिस आयुक्त, 4 अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि 13 पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे त्यांची यादी पुढील प्रमाणे –
1 सह पोलिस आयुक्त (जॉइंट सीपी)
विश्वास नागरे पाटील
4 अतिरिक्त पोलिस आयुक्त (अडिशनल सीपी)
संदीप कार्णिक
सत्यनारायण चौधरी
अतुल पाटील
दिलीप सावंत
13 पोलिस उपायुक्त (डिसीपी)
एन . हरीबालाजी
गीता चौहान
सोमनाथ घारगे
दत्ता नलावडे
प्रकाश जाधव
नितिन पवार
सुनील भारद्वाज
एन अम्बिका
विशाल ठाकूर
नियती ठाकर
बालकृष्ण यादव
विजय पाटील
मंजूनाथ सिंगे