अंबानींच्या इमारतीबाहेरील ‘त्या’ संशयास्पद वाहनाच्या मालकाचा मृत्यू! 

विधानसभेत शुक्रवारी, ५ मार्च रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित गाडीचा मालक मनसुब हिरेन याला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली होती.

मागील आठवड्यात रिलायन्स समूहाचे अध्यक्ष तसेच देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती, त्यात जिलेटीनच्या कांड्या आणि थेट अंबानी यांच्या कुटुंबाला धमकी देणारे पत्रही आढळून आले होते, ज्याची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. विधानसभेत शुक्रवारी, ५ मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित गाडीचा मालक मनसूब हिरेन याला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली होती, त्यानंतर अवघ्या दीड तासातच हिरेन याचा मृतदेह कालवा खाडीत सापडला. त्यावर फडणवीस यांनी हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याची मागणी विधानसभेत केली.

कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची केलेली तक्रार! 

अंबानी यांच्या अँटिलीया या इमारतीसमोर २८ फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पियो गाडी संशयास्पद आढळून आली होती. पोलिसांनी या गाडीची चौकशी केल्यानंतर ती गाडी मनसूख हिरेन या व्यक्तीच्या नावाने नोंद असल्याचे समोर आले होते. पोलीस त्याचा शोध घेत होते. शुक्रवार, ५ मार्च रोजी हिरेनच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात हिरेन बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.

(हेही वाचा : मुकेश अंबानींच्या जीवाला धोका? प्रकरण एनआयएकडे जाणार)

ठाणे खाडीत सापडला मृतदेह! 

कळवा खाडीत पोलिसांना शुक्रवार, ५ मार्च रोजीच १०.२५ वाजता एक मृतदेह सापडला, जो आकडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी त्या मृतदेहाची माहिती घेतली असता धक्कादायक माहिती हाती लागली. तो मृतदेह हा मुनसूख हिरेन याचा होता, जो मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयास्पद वाहनाचा मालक होता. त्यामुळे त्याचा पोलीस शोध घेत होते.

फडणवीस यांनी केली होती संरक्षण देण्याची मागणी! 

दरम्यान शुक्रवारी, ५ मार्च रोजी दुपारी हिरेन याच्या कुटुंबियांनी हिरेन बेपत्ता असल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती, संध्याकाळी ३.२० वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसूख हिरेन याला संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावेळी फडणवीस म्हणाले कि, अॅंटिलिया समोर ज्यांची गाडी सापडली, तो मालक या प्रकरणातील सर्वात मोठा दुआ आहे. त्यासाठी त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर अवघ्या दीड तासांत अर्थात सायंकाळी ४.४३ वाजता फडणवीस पुन्हा सभागृहात येऊन हिरेन याचा मृतदेह पोलिसांना सापडल्याची माहिती देत यासंबंधी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयाची माहिती द्यावी, अशी मागणी केली. तसेच हिरेन याचा मृतदेह आढळल्यामुळे हे प्रकरण भयानक होऊ लागले आहे. त्यामुळे आजच याची चौकशी एनआयएकडे सोपवावी, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

(हेही वाचा : अंबानींच्या घरासमोर माहितगारानेच उभी केलेली ‘ती’ कार?)

काय होते प्रकरण? 

  • २८ फेब्रुवारी रोजी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारती बाहेर संशयास्पद स्कॉर्पियो गाडी सापडली होती.
  • या कारमध्ये तपास यंत्रणेला जिलेटीनच्या कांड्या आणि एक चिठ्ठी सापडली होती.
  •  ही चिठ्ठी मुकेश अंबानी यांना उद्देशून लिहिण्यात आली होती व त्यात ‘यह तो एक ट्रेलर था…’ असे लिहिण्यात आले होते.
  • या प्रकरणाची जबाबदारी ‘जैश -उल हिंद’ या संघटनेने टेलिग्राम या समाज माध्यमावरून स्वीकारली.
  • मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले, याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here