संजय लाल (Sanjaya Lall) यांचा जन्म पाटणा येथे १३ डिसेंबर १९४ रोजी झाला आणि १९६० मध्ये पाटणा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात बीए ची पदवी प्राप्त करुन त्यांनी प्रथम क्रमांकासाठी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट जॉन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण घेतले, तसेच १९६३ मध्ये प्रथम श्रेणी घेऊन ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर लाल यांनी १९६५ मध्ये ऑक्सफर्ड येथे अर्थशास्त्रात एमफिलमध्ये डिस्टिंक्शन प्राप्त केले.
७५ सूचीबद्ध लेख लिहिले
१९६५ मध्ये संजय लाल (Sanjaya Lall) यांनी वर्ल्ड बॅंकेत अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम सुरु केले. ते ऑक्सफोर्डमध्ये डेव्हेलपमेंट स्टडीजचे संचालक देखील होते आणि ते सर्वोत्कृष्ट अर्थतज्ञांपैकी एक होते. त्यांनी १९७५ – २००३ दरम्यान ३३ पुस्तके लिहिली व सह-लेखन केले. प्रतिष्ठित व्यावसायिक जर्नल्समध्ये त्यांनी ७५ सूचीबद्ध लेख लिहिले तसेच आंतरराष्ट्रीय एजेन्सी व सरकारसाठी ६७ रिपोर्ट्स तयार केले आहेत.
संशोधनात्मक कार्य केले
लाल यांनी विकसनशील देशांमधील थेट परकीय गुंतवणुकीचा प्रभाव, बहु-राष्ट्रीय कॉर्पोरेशन्सचे अर्थशास्त्र तसेच विकसनशील देशांमधील तांत्रिक क्षमता आणि औद्योगिक स्पर्धात्मकता यावर त्यांनी संशोधनात्मक कार्य केले आहे. संजय लाल यांचे नाव जगातील प्रख्यात अर्थशास्त्रज्ञांमध्ये घेतले जाते. ते ऑक्सफर्ड डेव्हलपमेंट स्टडीज जर्नलचे संस्थापक संपादक देखील होते. लाल यांची कारकीर्द पाहता एका भारतीय माणसाने जगभरात भारताचा झेंडा फडकावला, असेच म्हणावे लागेल.
Join Our WhatsApp Community