गाड्यांच्या लिलावाबद्दल आपण खूपदा ऐकतो या कंपनीची गाडी अमुक कोट्यवधी किमतीत विकली गेली. त्या बद्दलच्या बातम्या आपण पाहतो. पण तुम्ही कधी गाडीच्या नंबर प्लेटचा लिलाव कोट्यवधीमध्ये झालेला ऐकलाय का? VIPकार नंबर प्लेट ‘P 7’ ने ‘मोस्ट नोबल नंबर्स’ चॅरिटी लिलावात विक्रमी ५५ दशलक्ष दिरहम (अंदाजे ₹१२२.६ कोटी) मिळवले आहे. आणि याची नोंद जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.
ज्याने ही नंबर प्लेट विकत घेतली आहे त्या व्यक्तीच नाव अद्याप समोर आलेले नाही. मोस्ट नोबल नंबरचा दुबईमध्ये लिलाव झाला, ज्यामध्ये अनेक नंबर लाखो कोटींना विकले गेले. या लिलावात P7 नंबर प्लेट सर्वाधिक किंमतीला विकली गेली आहे. या किमतीत मुंबईत स्वतच घर खरेदी करता येते.
लिलाव कुठे झाला?
हा लिलाव एमिरेट्स ऑक्शन्सने मोहम्मद बिन रशीद अल मकतूम ग्लोबल इनिशिएटिव्हजच्या योगदानाने आयोजित केला होता. जुमेराह येथील फोर सीझन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला.
या पैशांचे करणार काय?
या लिलावातील सर्व पैसे ‘वन बिलियन मील्स’ मोहिमेसाठी सुपूर्द केले जातील, ज्याची स्थापना जागतिक उपासमारीचा सामना करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. या लिलावात AA19, AA22, AA80, O71, X36, W78, H31, Z37, J57 आणि N41 सारख्या १० दोन-अंकी क्रमांकांसह अनेक नंबर प्लेट्स सहभाग घेतला होत्या.
(हेही वाचा – खुशखबर! आता आंबा घेऊ शकता EMIवर)
Join Our WhatsApp Community