P. S. Ramani : प्रख्यात न्यूरोसर्जन – पी. एस. रमाणी

202
P. S. Ramani : प्रख्यात न्यूरोसर्जन - पी. एस. रमाणी
P. S. Ramani : प्रख्यात न्यूरोसर्जन - पी. एस. रमाणी

प्रेमानंद शांताराम रमाणी (P. S. Ramani) हे एक भारतीय न्यूरोसर्जन आहेत. पी.एस. रमाणी यांनी न्यूकॅसलमध्ये उत्तम कामगिरी केली असून “पीएलाअयएफ” च्या न्यूरोस्पाइनल शस्त्रक्रिया तंत्रासाठी ते ओळखले जातात. पी.एस. रमाणी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३८ रोजी गोव्यातील वाडी तालौलीम गावात येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अहिल्याबाई आणि वन अधिकारी शांताराम रमाणी हे त्यांचे वडील. त्यांचे वडील कामानिमित्त बाहेरच असायचे म्हणून मुलांचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले.

मुंबईत एमएस पूर्ण केली. विशेष म्हणजे रमाणी यांनी डीन बनण्याची ऑफर नाकारली. १९७२ मध्ये इंट्राक्रॅनियल प्रेशर मॉनिटरिंगचा अभ्यास करण्यासाठी स्वीडनमधील मालमो येथे राहायला गेले. पुढे ते न्यूकॅसल अपॉन टायन, इंग्लंड येथे त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले.

न्यूकॅसलमधील लोक कोळसा खाणीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना पाठीच्या आणि मणक्याच्या समस्या उद्भवल्या होत्या. तेथे त्यांनी त्या लोकांवर यशस्वी उपचार केले. त्यामुळे त्यांचे नाव लोकांच्या ओठांवर येऊ लागले. त्यांनी १९७३ मध्ये न्यू कॅसल युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधून डॉक्टरेट पूर्ण केली आणि ते न्यूरोसर्जरीचे विशेषज्ञ झाले.

(हेही वाचा-Dr. Jagdishchandra Bose : भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस)

त्यांची इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या स्पेशालिटी बोर्डवर नियुक्ती झाली. परदेशात आपल्या यशाचा डंका वाजवून ते मायदेशी परतले. १९७३-१९७४ दरम्यान तेगोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले. काही महिन्यांनंतर ते मुंबईला गेले.

रमाणी (P. S. Ramani) यांनी न्यूरोसर्जरीमध्ये नवीन संकल्पना आणि तंत्रे आणली. विशेष म्हणजे त्यांनी डिस्क काढण्याचे तंत्र विकसित केले, यास “पीएलआयएफ रमाणी टेक्निक” असे म्हणतात. त्यांनी या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली आहे.

बाबा आमटे हे त्यांचे रुग्ण होते. विशेष म्हणजे रामदेव बाबा यांचे बंधू हे देखील त्यांचे रुग्ण होते. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी गोव्यामध्ये त्यांच्या सन्मानार्थ “डॉ पी एस रमाणी गोवा मॅरेथॉन” या नावाने मॅरेथॉन आयोजित केली जाते. ते सध्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ न्यूरोस्पाइनल सर्जन आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.