पच्चा रामचंद्र राव हे धातूशास्त्रज्ञ आणि ऍडमिनिस्ट्रेटर होते. त्यांचा जन्म २१ मार्च १९४२ साली आंध्रप्रदेशातील कृष्णा नावाच्या जिल्ह्यातल्या कवुतावरम या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव एस.आर. नारायणस्वामी नायडू आणि आईचं नाव लक्ष्मीबाई असं होतं. त्यांचे वडील हे सरकारी नोकर होते आणि को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे रजिस्ट्रार म्हणून निवृत्त झाले होते. रामचंद्र राव यांच्या आईसुद्धा साक्षर होत्या. मॅट्रिकपर्यंत त्या शिकलेल्या होत्या. (Patcha Ramachandra Rao)
(हेही वाचा – PM Narendra Modi : रशिया – युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचा युक्रेनच्या अध्यक्षांना सल्ला; म्हणाले …)
होम स्कुलिंग ते कुलगुरुपदापर्यंतचा प्रवास
रामचंद्र राव हे लहान असताना शाळेत गेले नाहीत. त्यांच्या पालकांनी त्यांना घरीच शिक्षण दिलं. आपण त्याला होम स्कुलिंग असं म्हणू शकतो. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना थेट सातवीलाच शाळेत घातलं. पुढे त्यांनी आंध्र लोयोला कॉलेजमधून आपलं इंटरमेडिएटचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढचं उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी हैद्राबादच्या उस्मानिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी त्याच कॉलेजमधून भौतिकशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
१९६३ साली बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (Indian Institute of Sciences) मधून धातूशास्त्र या विषयात बी. ई. ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे सुरू असलेल्या एका इंजिनिअरिंग प्रोजेक्टसाठी आणि डॉक्टरेट ही पदवी मिळवण्यासाठी ऍडमिशन घेतलं. २००२ ते २००५ सालादरम्यान हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे एकमेव कुलगुरू होते. ज्या युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी होते त्याच युनिव्हर्सिटीचे कुलगुरू ते होते ही मोठी गोष्ट आहे.
बनारस युनिव्हर्सिटीतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा (Defense Institute of Advanced Technology) कार्यभार स्वीकारला. इथे त्यांना रिटायर्ड होईपर्यंत काम करायचं होतं. २००७ सालापासून शेवटपर्यंत हैदराबाद येथील पावडर मेटलर्जी ऍंड न्यू मटेरियल्ससाठी आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात कार्यरत होते. (Patcha Ramachandra Rao)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community