रेखाचित्रे आणि व्यंगचित्रांसाठी हटके शैली वापरणारे भारतीय व्यंगचित्रकार पद्मभुषण Mario Miranda

126
मारियो मिरांडा (Mario Miranda) हे भारतीय व्यंगचित्रकार होते. मिरांडा हे द टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाईम्स यासह इतर वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत होते. मात्र द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या चित्रांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. मिरांडा यांचा जन्म २ मे १९२६ रोजी दमण येथे झाला.
त्यांनी (Mario Miranda) आपल्या करिअरची सुरुवात जाहिरात स्टुडिओमध्ये केली. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियामध्ये व्यंगचित्रकार म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली. त्यांची रेखाचित्रे आणि व्यंगचित्रांच्या हटके शैलीमुळे त्यांना अनेक मासिकात काम करण्याची संधी मिळाली. मिस निंबूपानी आणि मिस फोन्सेका यांसारखे त्यांचे व्यंगचित्र इकॉनॉमिक टाईम्स आणि द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियामध्ये नियमितपणे प्रकाशित होत राहिली.
पुढे त्यांनी (Mario Miranda) पोर्तुगलमध्ये जाऊन नशीब आजमावून पाहिलं. त्यानंतर ते लंडनला गेले, तिथे ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी काम करत आणि टेलिव्हिजन ॲनिमेशनमध्येही काम करत होते. त्यानंतर त्यांनी अनेक देशांमध्ये प्रवास केला, दरम्यान व्यंगचित्रे आणि प्रदर्शने या दोन गोष्टी ते सतत करत राहिले. मिरांडा १९८० मध्ये भारतात परत आले. त्यांना मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियामध्ये पुन्हा नोकरी मिळाली, तिथे त्यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासोबत काम केले. त्यानंतरही त्यांची यशस्वी घोडदौड सुरुच राहिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.