ज्येष्ठ प्रतिभावंत शास्त्रीय गायिका, लेखिका, विदुषी आणि प्राध्यापिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे शनिवारी, (१३ जानेवारी) पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याअगोदरच त्यांचे निधन झाले. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – Beed Accident : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू)
विविध पुरस्कारांनी सन्मानित
त्यांनी शास्त्रीय संगीताचा जगभरात प्रसार केला. ठुमरी, दादरा, ख्याल गायकी, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत व भजन यांच्यावर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. त्यांनी संगीतविषयक हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ११ पुस्तके लिहिली आहेत. नवी दिल्लीत या पुस्तकांचे प्रकाशन झाले होते. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’, ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन
वयाच्या आठव्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community