बी. शिवा राव (B. Shiva Rao) यांचा जन्म मंगळूर येथे २६ फेब्रुवारी १८९१ रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे वडील बी. राघवेंद्र राव, एक प्रसिद्ध वैद्य होते. चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून राव यांनी पदवी प्राप्त केली. बेनेगल नरसिंग राऊ आणि बेनेगल रामा राऊ हे त्यांचे मोठे भाऊ होते. ते कामगार चळवळीत सामील झाले आणि पुढे INTUC चे उपाध्यक्ष झाले.
१९२९ मध्ये त्यांनी ऑस्ट्रियन किट्टी व्हर्स्टेंडिगशी लग्न केले. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात राव (B. Shiva Rao) थिओसॉफिकल सोसायटी आणि ॲनी बेझंट यांच्यापासून प्रेरित झाले होते. द हिंदू आणि मँचेस्टर गार्डियनचे वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भारताच्या संविधानाची रचना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नेहरु आणि गांधींचे ते लाडके होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
(हेही वाचा Weather Update : देशासह राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता तर विदर्भासाठी ‘ऑरेंज अलर्ट जारी)
ते १९५२-५७ पर्यंत लोकसभेचे आणि १९५७-१९६० पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन त्यांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते आणि पहिल्या लोकसभेत दक्षिण कानरा मतदारसंघाचे निवडून आलेले प्रतिनिधी होते. एक पत्रकार आणि राजकीय नेता म्हणून त्यांची कारकीर्द चांगली राहिली आहे. भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
Join Our WhatsApp Community