पाकिस्तानी सैन्य आपल्याच देशातील लोकांवर अत्याचार करत असल्याचं वास्तव एका अहवालातून समोर आलं आहे. या अहवालानुसार, पाक सैन्यानं २०२२मध्ये बलुचिस्तानमधील १९५ निष्पाप लोकांची हत्या केली. तर १८७ लोकांवर अत्याचार केला आणि ६२९ जणांचं घरातून अपहरण करून त्यांना गायब केलं. या गायब केलेल्या लोकांचा ठावठिकाणा किंवा ते जिवंत आहेत की नाही याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे २०२२ हे वर्ष बलुचिस्तानसाठी अत्यंत भीतीदायक आणि वेदनादायी राहिलं आहे.
पाकिस्तानच्या मानवाधिकार संघटना बलुच नॅशनल मूव्हमेंटने जारी केलेल्या वार्षिक अहवालानुसार, पाकिस्तानच्या सैन्यानं २०२२मध्ये बलुचिस्तानमध्ये कहर केला. पाक सैन्यानं ६२९ लोकांना जबरदस्तीनं बेपत्ता केलं आणि १९५ लोकांची हत्या केली. तसंच १८७ लोकांवर अत्याचार केला. अहवालानुसार, २०२२मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या टॉर्चर सेलनं जबरदस्तीनं गायब केलेल्या १८७ जणांना सोडलं आहे.
कोण-कोणत्या महिन्यात किती निष्पापांची केली हत्या?
महिना हत्या जबरदस्तीने गायब केले छळ
जानेवारी १५ ९२ १
फेब्रुवारी ४२ ९५ ५
मार्च १९ ६२ ६
एप्रिल ३९ ५० १८
मे ५ ६१ २२
जून ११ २६
जुलै १६ ४६ २८
ऑगस्ट ५ ५५ ३७
सप्टेंबर २ ३० १९
ऑक्टोबर १५ ३८ १८
नोव्हेंबर २३ ३६ १४
डिसेंबर २ ३८ १९
(हेही वाचा – राष्ट्रवादीला मोठा धक्का: ‘या’ खासदाराला १० वर्षांची शिक्षा)
Join Our WhatsApp Community