पाकिस्तानात रात्री बाजार, माॅल,लग्नाचे हाॅल बंद ठेवण्याचे आदेश; काय आहे कारण

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने देशातील माॅल, लग्नाचे हाॅल, बाजार रात्री 8 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा बचत व्हावी आणि कच्च्या तेलाची आयात कमी करता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

पाकिस्तानच्या कॅबिनेटच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन धोरण मंजूर करण्यात आले. हे धोरण ऊर्जा बचत करण्यासाठी स्वीकारण्यात आले आहे. या धोरणामुळे मार्केट, माॅल्स रात्री 8:30 ला बंद केले जातील तर लग्नाचे हाॅल रात्री 10 वाजता बंद केले जातील. या उपाययोजनांमुळे पाकिस्तानचे 60 अब्ज रुपये वाचतील, असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: MSRTC चा मोठा निर्णय; मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर धावणार नाही ‘लालपरी’ )

कार्यालयांतही वीज बचत

याशिवाय पारंपारिक पद्धतीचे बल्ब आणि कमी कार्यक्षमतेचे पंखे निर्मिती पूर्ण बंद करण्यात आली आहे. याशिवाय सरकारी कार्यालयातील वीज वापरातही नियंत्रण येणार आहे. तसेच, रस्त्यावरही फक्त निम्म्या खांबावर वीजेचे दिवे सुरु ठेवले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here