इम्रान खान यांना अटक होणार; निवडणूक आयोगाने जारी केले अटक वाॅरंट

87

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए इन्साफचे नेते इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. पाकिस्तानमधील निवडणूक आयोगाने मंगळवारी इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील फवाद चौधरी तसेच असद उमर यांच्याविरोधात आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि अवमान केल्याच्या आरोपाखाली अटक वाॅरंट जारी केले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी ऑगस्ट 2022 मध्ये इस्लामाबादमधील एका रॅलीदरम्यान एका महिला न्यायाधिशाविरोधात वादग्रस्त विधान केले होते. तसेच, या भाषणामध्ये इम्रान खान यांनी महत्त्वाचे पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि आपल्या राजकीय विरोधकांवरही टीका केली होती. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी अतिरिक्त जिल्हा तसेच सत्र न्यायाधीश जेबा चौधरींविरोधात वादग्रस्त विधान केले होते.

( हेही वाचा: RRR ने रचला इतिहास; ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ )

50 हजार रुपये दंड जमा करण्याचेही आदेश

या भाषणानंतर काही तासांमध्ये इम्रान यांच्याविरोधात पोलीस आणि न्यायव्यवस्थेमधील व्यक्तींना धमकवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता निसार दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक आयोगाच्या चार सदस्यीय खंडपीठाने खान आणि त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात वाॅरंट जारी केले आहे. या वाॅरंटबरोबरच प्रत्येकाला 50 हजार रुपये दंड जमा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.