पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला डीवचण्यासाठी ट्विट केलं, अन् तेही दुसऱ्याचं चोरून?

भारतीय संघाचा गुरुवारी टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनमध्ये दारुण पराभव झाला. इंग्लंडने टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला. विजयसाठी दिलेला 169 धावांचे टार्गेट 16 व्या ओव्हरमध्येच पार केले. जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी 170 धावांची रेकाॅर्ड भागीदारी केली. या पराभवामुळे अनेक क्रिकेटप्रेमींचे भारत- पाकिस्तान फायनल सामना पाहण्याचे स्वप्न भंगले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला डिवचलं

या पराभवामुळे भारतीय संघाचे जगभरातील चाहते निराश झाले आहेत. पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र खूप आनंद झाला आहे. त्यांनी  भारतीय संघाला डिवचणारे एक ट्वीट केले. त्यामुळे भारतीय चाहते मात्र खवळले आहेत.

काय आहे ट्वीटमध्ये?

टी-20 वर्ल्डकपमध्ये सलग दुस-यांदा टीम इंडियाचा 10 विकेट्सने इतका मोठा पराभव झाला आहे. मागच्या वर्षी दुबईत टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला होता. त्यावेळी बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांनी नाबाद 152 धावांची भागीदारी केली होती. गुरुवारी झालेल्या सामन्यात तशीच भागीदारी जोस बटलर आणि एलेक्स हेल्सने केली. त्यांनी नाबाद 170 धावांची भागीदारी केली.

ट्वीट चोरल्याचा आरोप

पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ त्यांनी त्याच पाकिस्तानच्या विजयाची आठवण करुन दिली. त्यांच्या या ट्वीटरवर लोक भडकले. त्यांना चांगलेच सुनावने, एका फॅनने त्यांच्यावर आपले ट्वीट चोरल्याचा आरोप केला. कमीत कमी पदाची प्रतिष्ठा लक्षात घ्यावी, असे एका युजरने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here