धक्कादायक! पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर PFI समर्थकांकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

205

देशभरात पीएफआय या संघटनेवर NIA आणि ED ने छापेमारी करत शंभरहून अधिक लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर अनेक राज्यांत आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्रातूनही पीएफआयशी संबंधित 20 जणांना अटक करण्यात आली. आता पुण्यात पीएफआयशी संबंधित व्यक्तींनी पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा- ए- तकबीर, अल्लाह हू अकबरची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लिम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली. पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे नियोजन या आंदोलकांनी केले होते. मात्र, हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

( हेही वाचा: मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत )

पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गु्न्हा दाखल

यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आंदोलकांनी आरएसएस मुर्दाबाद अशीही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि 60 ते 70 पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.