चंद्रयान-३ (Chandrayan – 3) च्या यशस्वी लँडींग मुळे भारत यशाच्या शिखरावर पोहचला आहे. अनेक देशांनी भारताच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. यात भारताशी शत्रुत्वं असलेला देश पाकिस्तानच्या (Pakistan) एका अभिनेत्रीनेही भारताचे कौतुक करत पाकिस्तानला टोला लगावला. या अभिनेत्रीची प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय सध्या चांद्रयान ३ चं यश साजरं करत आहे. चंद्रयान-३ ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. या अद्भुत कामगिरीसाठी जगभरातील इस्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी म्हणाली, “भारताशी शत्रुत्व असलं तरी चंद्रयान ३ च्या माध्यमातून त्यांनी अंतराळ संशोधनात इतिहास घडवल्याबद्दल मी इस्रोचे अभिनंदन करते. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील दरी सर्व बाबींमध्ये इतकी वाढली आहे की आता पाकिस्तानला तिथे पोहोचण्यासाठी दोन ते तीन दशकं लागतील. दुर्दैवाने, आजच्या आपल्या दुर्दशेला इतर कोणी नाही तर आपणच जबाबदार आहोत.”
(हेही वाचा :IND vs IRE 3rd T20 : तिसरा टी 20 सामना पावसाने जिंकला, भारताची मालिकेत 2-0 ने बाजी)
सेहरने भारताचं अभिनंदन करणारं ट्वीट करण्याआधी उर्दूमध्ये आणखी एक ट्वीट केलं होतं. “आज भारत कुठे पोचला आहे आणि आपला देश मौलवी तमिजुद्दीनची विधानसभा बेकायदेशीरपणे बरखास्त केल्यापासून कायदा आणि संविधानाच्या वर्चस्वासाठी झटत आहे, हे पाहून खरोखरच आपली मान शरमेने झुकली आहे. आज भारताने हे सिद्ध केले आहे की आपल्यातील दरी इतकी वाढली आहे की ती कमी करणं आता पाकिस्तानच्या हातात राहिलेलं नाही,” असं सेहरने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Join Our WhatsApp CommunityApart from animosity with India, I would really congratulate ISRO for making history in the space research through Chandaryan3. The gap between Pakistan and India has widened to such a level in all aspects that now it will take two to three decades for Pakistan to reach there.…
— Sehar Shinwari (@SeharShinwari) August 23, 2023