पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन; दुबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

145

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचं रविवारी निधन झालं. याबाबतची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. परवेज मुशर्रफ यांच्यावर संयुक्त अरब अमीरातमधील अमेरिकन रुग्णालयात उपचार सुरू होते. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, अमाइलॉइडोसिस या आजारासोबत त्यांची झुंज सुरू होती.

माहितीनुसार, परवेज मुशर्रफ हे चालू देखील शकतं नव्हते. त्यांना व्हील चेअरची आवश्यकता होती आणि ते जेवू ही शकतं नव्हते. गेल्या १० जूनला अमाइलॉइडोसिस आजाराचे निदान झाल्यानंतर संयुक्त अरब अमीरातच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होत. या आजारामुळे हळूहूळू त्यांचे अवयव निकामी होत होते. गेल्यावर्षी जूनमध्ये त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत. अशा आजाराशी झुंज देत असताना रविवारी परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं.

परवेज मुशर्रफ यांचा जन्म दिल्लीचा

११ ऑगस्ट १९४३ साली परवेज मुशर्रफ यांचा जन्म दरियागंज नवी दिल्लीमध्ये झाला होता. १९४७ साली त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. विभाजन होण्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. मग त्यांच्या वडिलांनी नव्या पाकिस्तानी सरकारसोबत काम करण्यास सुरुवात केली आणि परराष्ट्र मंत्रालयसोबत ते जोडले होते.

(हेही वाचा – चीनचा ‘स्पाय बलून’ अमेरिकेने फोडला! F22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा)

काही वर्षानंतर परवेज मुशर्रफ यांच्या वडिलांची बदली तुर्कीला झाली, १९४९मध्ये ते तुर्कीला गेले. काही वर्ष तुर्कीत काढल्यानंतर ते तुर्की भाषा बोलायला शिकले. १९५७ साली पुन्हा मुशर्रफ यांचं कुटुंब पाकिस्तानात परतलं. त्यांचं संपूर्ण शालेय शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झालं आणि त्यांच पुढील शिक्षण लाहोरच्या फॉरमॅन ख्रिश्चियन महाविद्यालयात झालं.

मुशर्रफ यांना सुनावली होती फाशीची शिक्षा

परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं अशी शिक्षा सुनावली आहे.

३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर डिसेंबर २००७च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल परवेज मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर २०१३ साली देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ मार्च २०१४ रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आलं होत. ७९ वर्षीय मुशर्रफ यांनी १९९९ ते २००८ पर्यंत पाकिस्तानवर राज्य केलं. मार्च २०१६ पासून मुशर्रफ दुबईत राहत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.