इस्रायलने आपल्या सैन्याला संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. ४८ तासांत इस्रायलने गाझा सीमेवर ३ लाख सैनिक तैनात केले आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी अधिकाऱ्यांना गाझा पट्टीला अन्न, पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा थांबवण्यास सांगितले आहे.इस्त्रायलवर हमासकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्याची मोठी किंमत गाझापट्टीतील सर्वसामान्य जीवांना चुकवावी लागली आहे. इस्त्रायलकडून आज तिसऱ्या दिवशी सुद्धा घनघोर पद्धतीने गाझापट्टीत हल्ले सुरु असून अनेक पॅलेस्टिनी मृत्यूमुखी पडले आहेत. इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. (Israel Palaestine conflict)
हवेतून बॉम्ब वर्षाव, जमिनीवर नाकाबंदी
इस्त्रायलकडून वरून बाॅम्बवर्षाव सुरु असतानाच जमिनीवरूनही पूर्णत: नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पाणी, लाईट, खाद्यपुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रायलकडून देण्यात आले आहेत. फक्त तीन दिवसात गाझापट्टीत १ लाख २०हजारांवर विस्थापित झाले आहेत. दुसरीकडे, इस्त्रायलकडून एक लाखां राखीव तुकडी गाझापट्टीवर तैनात केली आहे. याठिकाणी हमासकडून १३० इस्त्रायलींना ओलीस ठेवल्याचे बोलले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ५१० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इस्त्रायलमध्ये ८०० जणांचा मृत्यू झाला आहे.
१०० हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले
हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गाझामध्ये १०० हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. हमास अधिकारी मौसा अबू मारझौक यांनी रविवारी अरबी भाषेत ही माहिती दिली. वरिष्ठ इस्रायली अधिकारी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आहेत, असाही दावा केला आहे. हल्ला रोखण्यात अयशस्वी झाल्याने प्रश्नांचा भडिमार होत असलेल्या इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, त्यांनी गाझाच्या सीमेवरील बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवले आहे, शेकडो लोकांना ठार केले आणि डझनभर कैदी म्हणून घेतले आहेत.
इराणने हल्ल्यास मदत केल्याचा दावा
इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या देशाने गाझाजवळ १०००,००० राखीव सैन्य जमा केले आहे. दुसरीकडे, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालातही मोठा दावा करण्यात आला आहे. इराणने हमासला आठवड्याच्या शेवटी इस्रायलविरूद्ध अचानक हल्ल्याची योजना आखण्यास मदत केली, परंतु संयुक्त राष्ट्रातील इराणच्या मिशनने सांगितले की इराण हल्ल्यांमध्ये सामील नाही. इराणच्या मिशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पॅलेस्टाईनच्या अखंड समर्थनात ठामपणे उभे आहोत, तथापि, आम्ही हल्ल्यात सहभागी नाही कारण तो केवळ पॅलेस्टाईनने केला आहे.”
(हेही वाचा : Devendra Fadnavis : टोलमुक्तीच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचे कार्यालय म्हणते…)
परदेशी नागरिकांनाही जीव गमवावा लागला
हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत २८ परदेशी नागरिकांचा जीव गेल्याचेही वृत्त आहे. यामध्ये नेपाळचे १० अमेरिकेचे ४,थायलंडचे १२ आणि युक्रेनचे २ नागरिक आहेत. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढण्याचे कामही सुरू केले आहे. थायलंड आणि कझाकस्तान आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी पोलंडचे विमान आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी इस्रायलला पोहोचले आहे. रोमानियानेही आपल्या ८०० लोकांना वाचवले आहे.
हेही पहा –