पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास CBI करणार; महाराष्ट्र सरकारची मान्यता

169

पालघर साधू हत्याकांड प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CBI कडे देण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

( हेही वाचा : मुंबई ते उरण फक्त ३० मिनिटांत प्रवास; मोरा जेट्टीच्या कामाला १५ दिवसांत होणार सुरूवात)

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास CBI करणार

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास तयार असून यावर कोणताच आक्षेप नसल्याचे महाराष्ट्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावाने दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी CID तपास सुरू होता आता यापुढे सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात याआधी साधारण २०० लोकांना अटक करण्यात आली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते तसेच या हत्याप्रकरणात ५ पोलिसांचे निलंबन तर ३० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.