दाढीबाबत अनोखं फर्मान! लग्न करताय? क्लीन शेव्ह करणं बंधनकारक!

155

लग्न करताना वरासाठी दाढी करणं बंधकारक असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर दाढीबाबत एक अनोखं फर्मान देखील जारी करण्यात आले आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यात कुमावत समाजातील पंचांनी लग्नासाठी आश्चर्यकारक नियमावली जारी केले आहेत. या नियमावलीमध्ये वराच्या दाढीबाबत दिलेल्या फर्मानने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

(हेही वाचा – Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?)

वराला क्लीन शेव्ह करणे बंधकारक

पाली जिल्ह्यातील १९ गावांच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या एका बैठकीत नवा नियम समंत करण्यात आला. तर यानुसार, कोणत्याही कुटुंबातील विवाह विधींमध्ये वराला क्लीन शेव्ह करणे बंधकारक असणार आहे. या संमत झालेल्या प्रस्तावानुसार, वराने दाढी केली असेल तर त्याला लग्नाला बसता येणार आहे आणि यासह सात फेरे घेता येणार आहे. पालीतील जुन्या बसस्थानक परिसरात ही बैठक झाली. यावेळी हा निर्णय झाला.

अशी आहे समाजाची नियमावली

या समाजातील लोकांनी स्पष्टपणे सांगितले की, विवाह हा संस्कार आहे त्याचे पालन करणे आवश्यक आहे. विवाह सोहळ्यात वराकडे राजा म्हणून पाहिले जाते, त्यामुळे दाढी वाढवून विधीला बसणं कितपत योग्य आहे? असा सवालही यानिमित्तानं करण्यात आला. लग्नात फॅशनची कोणतीही अडचण नाही. मात्र, दाढी वाढवून लग्न करणं समाजाला मान्य होणार नाही, असे देखील सांगण्यात आले  पश्चिम राजस्थानमध्ये लग्न समारंभ किंवा कोणत्याही स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अफू देण्याची प्रथा आहे. याशिवाय, लग्नापूर्वी हळदी समारंभात पिवळे कपडे, पिवळी फुलं, मेकअप आदींच्या नावाखाली होणारी उधळपट्टी रोखण्यासाठीही अनेक नियम करण्यात आले आहेत. सर्व विधी जुन्या परंपरेनुसारच करावेत, असे समाजाकडून घालण्यात आलेल्या नियमात म्हटले आहे. तसेच या जिल्ह्यातील १९ गावांना या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.