साखर कारखानदारी क्षेत्रातले एक मोठे नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच हे धाडसत्र सुरु आहे. अभिजीत पाटील यांच्याशी संबंधित चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु आहे. मुळचे पंढरपूरचे रहिवासी असलेले अभिजीत पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकणीच गुरुवारी 25 ऑगस्टला आयकर विभागाचे पथक दाखल झाले असून, सध्या तपासणी सुरु आहे.
( हेही वाचा: शिंदे गटाच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे; विधीमंडळाच्या पाय-यांवर व्यंगचित्राच्या बॅनरसह घोषणाबाजी )
अभिजीत पाटील हे पंढरपूरमधील एक बडे उद्योजक आहेत. तरुण उद्योजकाच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरु झाल्याचे बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या उद्योजकाने काही वर्षांतच राज्यातील चार खासगी कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. अशातच अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपणे चालवून दाखवला होता.
Join Our WhatsApp Community