पंढरपुरात रूळ ओलांडताना ४ जणांना रेल्वेची धडक, तिघांचा मृत्यू

पंढरपूरमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेने चार जणांना मंगळवारी पहाटे धडक दिली आहे. रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. धडकलेले हे चारही जण कामगार असून दुसऱ्या राज्यातील होते. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण चार कामगार पहाटे रूळ ओलांडताना ही घटना घडली. त्यातील तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. अत्यंत भीषण असा अपघात असून यामध्ये मृत्यू झालेल्या कामगारांचे शीर धडापासून वेगळे झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर रेल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा – Railway Security Force: रेल्वे सुरक्षा दलाद्वारे मानवी तस्करी विरुद्ध देशव्यापी मोहीम)

अपघात झालेल्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यामुळे या चारही जणांनी मद्यपान केल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या धडकेनंतर जखमी झालेल्या चारही जणांना त्वरीत त्याठिकाणी असणाऱ्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर अवस्थेत जखमी असून त्यावर उपचार सुरू आहे.

ही घटना घडल्याचे समजताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत व्यक्ती आणि जखमींची ओळख पटलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here